Home गडचिरोली कोरची तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात पक्ष प्रवेश

कोरची तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात पक्ष प्रवेश

151

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : “सबका साथ सबका विकास“ या मुल मंत्रावर चालणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेऊन अनेक लोक इतर पक्षातून भाजपात पक्षप्रवेश करत आहेत. गाव-खेड्यातील कार्यकर्ते मोठया संख्येने भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश करीत आहेत. याचे कारण भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असल्याची ग्वाही आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंज येथील पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने दिली. कोरची तालुक्यातील बेळगाव, गॅरापत्ती, प्रतापगड व इतर गाव परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी अरविंद सावकार पोरेड्डीवार, विधानसभा समन्व्यक किसन नागदेवे, आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.

यावेळी सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरड्डीवार, जिल्हा नागरी सह. बँक अध्यक्ष प्रकाश सावकार पोरड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, विधानसभा निरीक्षक श्रीनिवास, विधानसभा समन्वय किसन नागदेवे, भाजप महामंत्री सदानंद कुथे, भा. ज. पा. तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी आदी उपस्थित होते.

यावेळी पक्षप्रवेश करणारे बेडगाव, ग्याराबत्ती येथील दिनेश मडावी, रघुनाथ आचला, मेहत्तर ताडामी, चमार सोंडा, पोटावी, मनीकसाय हुपुंडी, भवनसिंग तुलावी, अमर ताडामी, अतीराम बोगा, धनसिंग मडावी, धामणसिंग पुरी, मेहरसिंग मेहता, संतोष कुरचाल, लालसाय कचलामी, सोमनाथ कुमोटी, चमारसिंग पुडो, प्रतापगड येथील गुलाब निदान, सुरेश हलामी, मोतीराम निदान, संजय नैतान, गोविंद निदान, ओम नैताम, प्रदीप नरोटे आदींचा समावेश आहे.

error: Content is protected !!