विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अहेरी उपविभागाअंतर्गत येत असलेल्या रेपनपल्ली पोलीस स्टेशन येथे आज, रविवार ३ नोव्हेंबर रोजी दीपावली व भाऊबीज सणाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते व जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी भेट दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता तथा जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र गडचिरोली जिल्हा अध्यक्ष यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पीएसआय पवार साहेब, पीएसआय मेश्राम मॅडम यांच्यासोबत सदिच्छा भेट दिली व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुदीप रंगुवार. प्रदीप नीलम, सुधाकर बंडावार, स्नेहदीप आत्राम, महेश, अक्षय मडावी, राजू नलगुंटा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.







