Home गडचिरोली माजी आमदार हरिरामजी वरखडे यांना आमदार कृष्णा गजबे यांनी वाहिली श्रद्धांजली

माजी आमदार हरिरामजी वरखडे यांना आमदार कृष्णा गजबे यांनी वाहिली श्रद्धांजली

81

विदर्भ क्रांती न्यूज

 गडचिरोली : आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. हरिरामजी वरखडे यांचे 2 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास नागपूर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. या संबंधित आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांना निधन झाल्याची बातमी माहिती होताच ते जोगीसाखरा येथील निवासस्थानी जाऊन अंतिम दर्शन घेत अंत्यविधीला उपस्थित राहून शोकसभेच्या निमित्ताने त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मौन पाडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत वरखडे परिवाराला दु:खद सावरण्याचे बळ देवो अशी, ईश्वरचरणी प्रार्थना करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी शोकसभेला लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॉ. रामकृष्णजी मडावी, सामाजिक नेते भाग्यवानजी खोब्रागडे, जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, तालुकाध्यक्ष सुनिलजी पारधी, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी अनिलजी धामोडे, संजयजी बारापात्रे,‌ कटरे, तसेच सन्माननीत व्यक्ती व मोठया संख्येने कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!