शिवसेना सहसंपर्क प्रमुखपदी अरविंद कात्रटवार यांची नियुक्ती

325

– विलास ठोंबरे जिल्हा संघटक तर भरत जोशी जिल्हा समन्वयक

गडचिरोली : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यातील प्रभारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांची गडचिरोली, धानोरा, आरमोरी, वडसा, कोरची, कुरखेडा या तालुक्यांंसाठी सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विलास ठोंबरे यांची जिल्हा संघटक तर भरत जोशी यांची जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन या नियुक्त्या करण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.