चामोर्शी नगरपंचायतवर भाजपाची एकहाती सत्ता येणार : प्रमोद पिपरे

131

– चामोर्शी नगरपंचायतच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीची महत्वपूर्ण बैठक

गडचिरोली : चामोर्शी येथील नगरपंचायतची निवडणूक २१ डिसेंबर २०२१ ला होत असल्याने भारतीय जनता पार्टीचे संभाव्य उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी चामोर्शी नगरपंचायतवर भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा चामोर्शी तालुका निवडणूक प्रभारी प्रमोद पिपरे यांनी केले. बैठकीमध्ये भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी निवडणुकीची तयारी करावी, उमेदवाराचे कागदपत्र, उमेदवाराची जात पडताळणी, आचारसंहिता प्रत्येक उमेदवाराने पाळली पाहिजे तसेच इतरही महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली व वार्डावार्डात जावून मतदारांचा कौल घेण्यात आला. या बैठकीला तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, स्वप्नील वरघंटे, साईनाथ बुरांडे, आनंद गण्यारपवार, प्रशांत एगलोपवार, आशिष पिपरे, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.