भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आशा प्रशांत नाकाडे यांची निवड

149

– भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी केली घोषणा

गडचिरोली : जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या कुटुंबांतील सदस्यांचा भाजपाने नेहमीच सन्मान केला आहे. पक्ष संघटना वाढीसाठी म्हणून देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील सुप्रसिद्ध असलेल्या प्रशांत नाकाडे यांच्या अर्धांगिनी आशा नाकाडे यांची भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून भाजपा प्रदेशच्या मार्गदर्शनात निवड करण्यात आली आहे. भाजपा जिल्ह्यात वाढविण्यासाठी काम करणाऱ्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार आशा प्रशांत नाकाडे यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी केली आहे. या निवडीचे श्रेय विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. रामदासजी आंबटकर, आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे यांना दिले आहे. या निवडीबद्दल भाजपाचे जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, प्रशांतजी वाघरे, रविंद्रजी ओल्लालवार, प्रमोदजी पिपरे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सभापती प्रा. रमेशजी बारसागडे, प्रदेश सदस्य किसान मोर्चा रमेशजी भुरसे, प्रदेश महामंत्री आदिवासीं मोर्चा प्रकाशजी गेडाम, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा योगिताताई भांडेकर, ओबीसी नेते प्रणय खुणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, देसाईगंज नगराध्यक्ष शालुताई दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा आदींनी अभिनंदन केले आहे.