भेंडाळा येथे ‘तुटलं नातं रक्ताच’ या नाटकाचे उद्घाटन

96

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले मंडळ यांच्या वतीने आयोजित ‘तुटल नात रक्ताच’ या नाटकाचे उद्घाटन भाजपा जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खा. अशोक नेते यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डाॅं. देवराव होळी तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचेे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

‘तुटलं नात रक्ताच’ या धार्मिक नाट्य प्रयोगाप्रमाणे आपल्या राजकीय फायद्याकरिता ‘तोडल नात हिंदुत्वाचे’ अश्या नाट्य प्रयोगाची आवश्यकता आहे. कारण महाराष्ट्रातील शिवरायांवर प्रेम करणाऱ्या जनतेला याची प्रचिती येत असल्याचे प्रतिपादन खा. अशोक नेते, आमदार डाॅ. देवराव होळी व प्रकाश गेडाम यांनी केले. यावेळी भाजयुमो प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, सरपंच कुंदाताई जुवारे, जि. प. सदस्य कविताताई भगत, पंं. स. सदस्य धर्मशीलाताई सहारे, पोलिस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री,  उपसरपंच विठ्ठल सातपुते, संजय चलाख, ग्रामपंचायत सदस्य निखिल उंदिरवाडे, डांगे, मोगरे उपस्थित होते.