मुलचेरा येथे स्वतंत्र धान्य खरेदी सरकारमान्य सोसायटीमार्फत करण्यात यावी

87

– भाजपाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

गडचिरोली : मुलचेरा येथे स्वतंत्र धान्य खरेदी येथील सरकारमान्य सोसायटीमार्फत करण्यात यावी, चामोर्शी येथील संस्थेच्या माध्यमातून खरेेेदीचा व्यवहार होऊ नये अशी परवानगी द्यावी याकरिता भाजपा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम यांच्या नेतृत्वात मुलचेरा येथील बंगाली समाजाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी गडचिरोली यांची भेट घेऊन चर्चा केली. जिल्हाधिकारी यांंनी संबंधित अधिकारी यांंना तशा सूचना दिल्या. यावेळी भाजपा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम यांच्या नेतृत्वात बंगाली समाजाच्या समस्यांंचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांंना देण्यात आले.