ग्रामीण भागातील खेळांमधूनच देशाला मिळतात उत्तम क्रीडापटू : आमदार डॉ. देवराव होळी

125

– चंदनखेडी (वन) येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

गडचिरोली : ग्रामीण भागातील खेळाडूंनी नेहमीच देशाचे नाव मोठे केले असून ग्रामीण भागातील खेळांमधूूनच देशाला नवीन क्रीडापटू मिळत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी चंदनखेडी (वन) येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी केले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख राकेशभाऊ बेलसरे, चंदनखेडी (वन) चे पोलीस पाटील बालाजी तलांडे, चौड्डमपल्लीचे सरपंच कैलासजी मडावी, मुख्याध्यापक श्यामराव लेगला, प्रकाश सिडाम शिक्षक, विलास कोरेत वनरक्षक , ग्रामपंचायत सदस्य रामदास करपते, राजू उरेते यांच्यासह क्रीडाप्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.
जय पेरसापेन क्रीडा मंडळ चंदनखेडी (वन) च्या सौजन्याने भव्य व्हॉलीबॉल ग्रामीण सामने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर देवराव होळी म्हणाले, ग्रामीण भागात उत्तम दर्जाचे खेळाडू असून त्यांना संधी देण्याची आवश्यकता आहे. त्यांना या अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून उत्तम संधी मिळत असून पुढे हेच खेळाडू देशाला चांगले क्रीडापटू म्हणून मिळत असतात. त्यामुळे त्यादृष्टीने आपण या खेळांकडे बघण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले व सर्वांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.