नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते विघ्नहर्ता अक्सिडेंट हॉस्पिटलचे उद्घाटन

94

गडचिरोली : स्थानिक धानोरा रोडवरील अप्पलवार हॉस्पिटलच्या बाजूला, सिटी हॉस्पिटलच्या समोर अस्थीरोग तज्ञ डॉ. रोहन जब्बलवार यांच्या विघ्नहर्ता अक्सिडेंट हॉस्पिटलचे नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

विघ्नहर्ता अक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये फ्रॅक्चर उपचार, हाडांच्या शस्त्रक्रिया, हाडांचे आजार, सांधेदुखी, गुडघेदुखी, संधिवात, डिजिटल एक्स-रे, जन्मतः अस्थिव्यंग उपचार, इलीझारोव्ह सर्जरी, सी-आर्म, कृत्रिम सांधेरोपण यावर उपचार होणार असून दवाखान्यात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याचे अस्थिरोग तज्ञ M.B.B.S. डॉ. रोहन जब्बलवार यांनी सांगितले आहे.
उद्घाटनप्रसंनी प्रमुख अतिथी म्हणून रविन्द्रजी वासेकर, हेमंतभाऊ जम्बेवार, डॉ. हेमंत अप्पलवार, वामनराव चिटनुरवार, दामोधर मंडलवार, नरेंद्र मल्लेलवार, निरंजनजी वासेकर, सुनिल चडगुलवार, डॉ. विशाल वळवी उपस्थित होते.