गडचिरोली जिल्हा प्राथ. शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांंबाबत केली चर्चा

81

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा पदाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती हेमलता परसा यांच्याशी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या संदर्भात प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. तसेच प्रलंबित समस्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी म. रा. प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा सरचिटणीस आशिष धाञक, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, जिल्हा सल्लागार निलकंठ निकुरे, मुलचेरा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष तथा चामोर्शी/मुलचेरा प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्थेचे प्रभारी अध्यक्ष अशोक बोरकुटे, धानोरा तालुका संघटक नरेंद्र कुनघाडकर, गडचिरोली तालुकाध्यक्ष धनेश कुकडे, एटापल्ली तालुकाध्यक्ष तेजराज नंदगिरवार, अरुण सिडाम पं. स. एटापल्ली आदी पदाधिकारी उपस्थित होते. अहेरी व मुलचेरा पं.स.अंतर्गत कार्यरत डि.सि.पी.एस.धारक प्राथमिक शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाचा पहीला हप्ता रोखीने त्वरीत अदा करण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जि.पि.एफ.मध्ये त्वरीत जमा करण्यात यावा,  डी.सी.पी.एस.धारक शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता त्वरीत रोखीने देण्यात यावा, जिल्ह्यातील संपुर्ण शिक्षकांना एकस्तरनुसारच वेतन देण्यात यावे, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्ती बिलकरिता जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे प्रमाणपञ अनिवार्य न करणे, श्री निलकंठ आवारी जि. प. प्राथमिक शाळा मौशिखांब पं.स.गडचिरोली यांची पाचव्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम अजुनपर्यंत जमा झालेली नाही ती त्वरीत जमा करण्यात यावी, लिलाधर वासेकर सर पं. स. सिरोंचा यांची ६ व्या वेतन आयोगाची पाचव्या हप्त्याची रक्कम त्यांच्या जि.पी.एफ.खात्यात त्वरीत जमा करण्यात यावी, मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपुर यांचे निर्णय आदेश ७ सप्टेंबर २०२१ जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतन वाढ त्वरीत देण्यात यावी,  जिल्हास्तरावर प्रलंबीत असलेली वैद्यकीय प्रतिपुर्तीची प्रकरणे त्वरीत निकाली काढणेबाबत, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत पाञ शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ तात्काळ लागु करण्याबाबत, जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, पदविधर शिक्षक, विषय शिक्षक, बांग्ला भाषीक शिक्षक यांची रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी, मुख्याध्यापकांना शालेय आर्थिक व्यवहार करतांना रु.१०००/- च्या वर रक्कम काढता येत नाही ही अट रद्द करण्यात यावी, इयत्ता ६ वी ते ८ वी या वर्गावर अध्यापन करणा-या शिक्षकांपैकी १/३ विषय शिक्षकांना पदविधर वेतनश्रेणी लागु करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये अनेक ञृटी असल्यामुळे आक्षेप प्राप्त होताच यादीतील ञृटीची पुर्तता करुन, विषय संवर्ग निहाय, सेवाजेष्ठतेनुसार, मंजुर पदाच्या १/३ विषय शिक्षकांची यादी पुनश्च प्रसिद्ध करण्यात यावी, आंतरजिल्हा बदलीने बाहेर जिल्ह्यातुन आलेल्या शिक्षकांचा सेवा नियमितचा प्रश्न आपल्या जिल्हा स्तरावरच सेवा नियमित करुन सोडविण्यात यावा, जिल्ह्यातील विवीध पं. स.अंतर्गत प्रलंबित आर्थीक प्रकरणे निकाली काढण्यासाठी मागविण्यात आलेली आँँफलाईन अनुदान संबंधित पं. स. ना त्वरीत पाठविण्यात यावी,  जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित असलेले जि.पि.एफ.चे परतावा/नापरतावा प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावे.(श्री ओमप्रकाश झाडे व इतर), जिल्हा परिषदेतील शिक्षण समितीवर आमच्या संघटनेतील एक प्रतिनिधी (आमंञित सदस्य) घेणे, आजच्या चर्चेत निवेदनातील सर्वच मुद्यांवर जवळपास १ तास सविस्तर चर्चा करण्यात आली आणि निवेदनातील प्रलंबित समस्या लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती हेमलता परसा यांनी उपस्थित प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिलेले आहे. चर्चेवेळी प्रशासनाच्या वतीने शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी दुधराम रोहणकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी धनंजय दुम्पेट्टीवार जि. प. गडचिरोली आदी उपस्थित होते.