वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीने शासनास निवेदन

122

गडचिरोली : 22 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता “वन संपदा इमारत,आलापल्ली “च्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या “वन हुतात्मा स्मारक अल्लापल्ली” येथे म. रा. वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर अंतर्गत विभागीय शाखा अलापल्ली, भामरागड व सिरोंचाच्या आवाहनानुसार वन शहीद झालेल्या स्वाती ढुमणे’ वनरक्षक कोलारा (कोर) आणि सिरोंचा वनविभागांतर्गत वनतस्करांंकडून शहीद झालेल्या समय्या मदनय्या गोरा रोजंदारी मजूर या दोन्ही वन हुतात्म्यांना सिरोंचा, भामरागड, अल्लापल्ली व वन्यजीव चौडमपल्ली विभागात कार्यरत क्षेत्रीय तथा कार्यालयीन वन कर्मचाऱ्याकडुन पुष्पचक्र अर्पण करून दोन मिनिटाचा मौन धारण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच विभागीय कार्यालय आलापल्ली व भामरागडच्या उपवनसंरक्षक महोदयांना वनरक्षक, वनपालांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. सदर प्रसंगी म. रा.क्षवनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे वृत्तीय अध्यक्ष पी.आर.आणकारी, उपाध्यक्ष बुद्धावार, सरकार, सहसचीव मांडवकर, तसेच आलपल्ली वनविभागाचे विभागीय अध्यक्ष जुवारे, उपाध्यक्ष कुमरे, पडलवार, सचिव श्री.गोलेवार, कार्याध्यक्ष श्री.वडेट्टीवार, सिरोंचाचे अध्यक्ष श्री. कांदो, भामरागडचे श्री.रंगुवार व वृत्तीय तथा विभागीय पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर संघटनेच्या वतीने उपवनसंरक्षक अल्लापल्ली व भामरागड यांना ट्रांजिट लाईनवर काम करण्यास आवश्यक मनुष्यबळ व सुरक्षेचे साहित्य पुरवठा करावे व अन्यथा वनरक्षक वनपाल यांना ट्रांजिट लाईन सर्वे करण्यास बाध्य करू नये, असे निवेदन वृत्त अध्यक्ष व विभागीय अध्यक्ष यांच्या वतीने कार्यालय प्रमुखास देण्यात आले. श्रद्धांजली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री अविनाश कोडापे, राजू सांगडे, कोकोडे, झाडे, दोहतरे, येलीचपूरवार, पसपूनूरवार क्षेत्रिय तथा कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मदत केली.