खा. अशोक नेते यांच्या हस्ते ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ

101

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात ओबीसी जागर अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज १९ नोव्हेंबर रोजी वडसा तालुक्यातील आमगाव येथून खासदार अशोक नेते यांच्या हस्ते ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ओबीसी मोर्चा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी बगमारे, देवीदासजी ठाकरे, वडसाच्या पं. स. सभापती रेखाताई अनोले, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी पारधी, शामरावजी अनोले, योगेश नाकतोडे, कैलास पारधी, वसंता दोनाडकर, प्रकाश कुथे, नरेंद्र ढोरे व गावातील नागरिक उपस्थित होते.