खासदार अशोक नेते यांच्या हस्ते देवरी तालुक्यातील देवाटोला येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

81

गडचिरोली : बाल गणेश क्रीडा मंडल देवाटोलाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन खासदार अशोक नेते, आ. डॉ. परिणयजी फुके, माजी आमदार संजयजी पुराम, माजी जि. प. अध्यक्ष विजयजी शिवणकर यांच्या हस्ते विधिवत पूजनाने व फीत कापून करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांनी क्रिकेट खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्रजी अंजनकर, माजी सभापती सुनंदाताई बहेकर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.