पिपरटोला येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे उपसभापती विलास दशमुखे यांच्या हस्ते भूमिपूजन

81

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील पिपरटोला येथे गडचिरोली पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे यांच्या १५ वित्त आयोग स्थानिक निधीतून सिमेंट – काँक्रीट रस्त्या मंजुर केले. या कामाचे भूमिपूजन उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांंच्या हस्ते सरपंच श्रीमती भावनाताई फुलझले यांंच्या अध्यक्षतेखाली, तालुका भाजपा महामंत्री हेमंत बोरकुटे, त्र्यंबक पा. फुलझले, शंकरजी शेडमाके, टी. के. पाटील फुलझले, नारायण सहारे, श्रीधर शेजारे, श्यामराव शेडमाके, राजेंद्र भनारकर आदींंच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सरपंच भावनाताई फुलझले यांनी गावातील समस्या अवगत केल्या. यावर उपसभापती यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. स्थानिक विकास निधीतुन २ लक्ष रुपयाचे सिमेंट – काँंक्रीट रस्ता दिल्याबद्दल गावकऱ्यांनी आभार मानले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.