– गडचिरोली येथे १४ नोव्हेंबरला राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा
गडचिरोली : राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन १४ नोव्हेंबर २०२१ रोजी रविवारला सकाळी १०.३० वाजता शिव पार्वती मंगल कार्यालय गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी या वधु-वर पालक परिचय मेळाव्यास तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी केले आहे. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा योगिताताई प्रमोद पिपरे, सहउद्घाटक म्हणून आरमोरी एज्युकेशन सोसायटीचे भाग्यवन खोब्रागडे राहतील. सत्कारमूर्ती म्हणून जेष्ट नागरिक विठोबा बुरांडे राहतील. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, संताजी सोशल मंडळ अध्यक्ष देवानंद कामडी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज प्रभाकर वासेकर, माजी जि. प. अध्यक्ष योगिताताई भांडेकर, जि. प. कृषी सभापती रमेश बरसागडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सत्यविजय दुधबळे, मार्कंडेश्वर देवस्थान अध्यक्ष गजानन भांडेकर, राहुलजी नैताम, देवराव सोनटक्के, तुलसीदास कुनघाडकर, बुधाजी किरमे आदी मान्यवर उपस्थित राहनार आहेत. तेली समाज मेळाव्यात राज्यातील तसेच परराज्यातील वधु-वर आणि पालक परीचयासाठी ऑनलाइन wadhuwar ॲपला रजिस्टर करून उपस्थित राहणार आहेत. वधु-वर आणि पालकांना वधु-वर नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन ॲप wadhuwar ची सुविधा उपलब्ध केली आहे. स्वतःचे मोबाईलवर ॲप डाउनलोड करून आपली नोंदणी करता येईल किंवा 8208274671 ला संपर्क करून घ्यावे, असेही आवाहन प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे. तेली समाजाला सामुहिक रितीने वधु-वर परिचय करता यावा, वेळ आणि पैश्याची बचत व्हावी, या उद्देशाने २०२१ वर्षाच्या शेवटच्या क्षणी दिवाळी आणि भाऊबीज निमित्ताने तेली समाजाचे वधु-वर पालक परिचयाचे कार्यक्रम गडचिरोली जिल्हयात राष्ट्रीय तेली समाज मॅरेज ब्युरोच्या सानिध्यातून दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रमोदजी पिपरे यांनी कळविले आहे.