डॉ. शिवनाथजी कुंभारे यांच्या वाढदिवशी ३१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

66

गडचिरोली : येथील नामांकित धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्याय महाराष्ट्रचे विश्वस्त डॉ. शिवनाथजी कुंभारे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त डॉ. अनंता शिवनाथजी कुंभारे यांच्या नेतृत्वात व मित्र परिवाराच्या सहकार्याने येथील चामोर्शी मार्गावरील धन्वंतरी हाँस्पिटलमध्ये ११ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी चमूचे डॉ. उमेश शिडाम, निशाली भरणे, सतीश तडकलवार, निलेश सोनवणे, विवेक मून, वसंत नान्हे, किशोर रामटेके, राहूल शिडाम, बंडू कुंभारे आदींनी सहकार्य केले.