आ. डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात विलास दशमुखे व केशव निंबोड यांचा वाढदिवस साजरा

144

गडचिरोली : येथील पंचायत समितीचे उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास दशमुखे व नगरसेवक केशव निंबोड यांचा वाढदिवस गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर,
भाजपा शहर अध्यक्ष तथा न. प. पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, भाजपा तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे आदींची उपस्थिती होती. तसेच महिला रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. विविध संघटनांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, ग्रामसेवक युनियनचे कविश्वर बनपूरकर, जीवनदास ठाकरे, हेमंत गेडाम, मंगल डाखरे आदींची उपस्थिती होती.