प्रत्येकाने समाजाच्या व देशाच्या हितासाठी कार्य करावे – डॉ. शिवनाथजी कुंभारे

115

– ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव सोहळा उत्साहात पडला पार

गडचिरोली : जीवनात प्रत्येकाला समाजासाठी काही तरी देणे लागते. हा विचार ठेवून प्रत्येक व्यक्तीने समाजाच्या व देशाच्या हितासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन डॉ. शिवनाथजी कुंभारे यांनी केले. येथील नामांकित धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्याय महाराष्ट्रचे विश्वस्त डॉ. शिवनाथजी कुंभारे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त डॉ. अनंता शिवनाथजी कुंभारे यांच्या नेतृत्वात व मित्र परिवाराच्या सहकार्याने कमल – केशव सभागृह कात्रटवार काम्प्लेक्स गडचिरोली येथे ११ नोव्हेंबर २०२१ रोजी अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा ओबीसी कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, माजी खासदार मारोतराव कोवासे, भाजपा महाराष्ट्रचे माजी संघटन मंत्री रविजी भुसारी, डॉ. शिवनाथजी कुंभारे यांच्या अर्धांगिनी सौ. सुमन कुंभारे, लेखा-मेंढा येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. देवाजी तोफा, भ्र. वि. ज. आ. महाराष्ट्र उपाध्यक्ष बालाजी कोपुलवार, भ्र. वि. ज. आ. महाराष्ट्र सचिव अशोक शब्बन, जि. प. सदस्य अँड. रामभाऊ मेश्राम, बंडोपंत बोढेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना. विजयभाऊ वडेट्टीवार, आमदार डॉ. देवराव होळी, रविजी भुसारी आदींची शुभेच्छा संदेशपर भाषणे झाली. या कार्यक्रमात मान्यवर व मित्र मंडळींनी डॉ. कुंभारे यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमानंतर नाशिक येथील पंडित वैराळकर यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, गुरुदेव भक्त, मित्र मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.