मानवता धर्म हाच श्रेष्ठ धर्म : धर्मसभेत महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे प्रतिपादन

105

– आमगाव (बुट्टी) येथे दत्त जयंतीनिमित्त धर्मसभा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्री गोविंदप्रभू महानुभाव मंडळ आमगावच्या वतीने दत्त जयंती मोहोत्सव निमित्त 23 डिसेंबर रोजी धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. मानवता धर्म हाच श्रेष्ठ धर्म असून हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सारख्या सर्व धर्माचा अंतिम उद्देश हा मानवी कल्याण आहे. त्यामुळे धर्मद्वेष विसरून सगळ्या मानवजातीने एकत्र येत मानवता धर्म जपला पाहिजे, असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी धर्मसभेत मांडले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मकरधोकडा महाराज उपस्थित होते. मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेव किरसान, जिल्हा सचिव तथा निवडणूक सल्लागार सुनील चडगुलवार, जि. प. माजी उपाध्यक्ष जीवन पा. नाट, राजू रासेकर, परसराम टिकले, राजेंद्र बुल्ले, नरेंद्र गजपूरकर, नितीन राऊत, पिंकू बावणे, आरती लहरी, सरपंच रुपलता बोदले, उपसरपंच प्रभाकर चौधरी, मनोहर खेकाटे सह अनेक, काँग्रेस नेते, इतर मान्यवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.