समाजातील अंतिम घटकांचा कल्याण हेच येशू ख्रिस्तांची खरी शिकवण : महेंद्र ब्राम्हणवाडे

130

– वडसा येथे येशू ख्रिस्त जन्मोत्सव साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : न्यू हार्वेस्ट मिनिस्ट्री वडसाच्या वतीने वडसा येथे येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातील अंतिम घटकाचा कल्याण हीच खरी येशू ख्रिस्तांची शिकवण असून त्यांचे विचार समस्त मानवी जातीच्या कल्यानासाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे मनाला शांतता प्राप्त होते व जीवनात त्यांच्या वाटेवर चालून कल्याण करण्याची भावना निर्माण होते, असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. सोबत काँग्रेसचे जेष्ठ नेते जेसाजी मोटवाणी, ठाणेदार मेश्राम, निलोफर, मेरी विल्सन, अनुसूचित विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जितेंद्र पा. मुनघाटे, संजय चन्ने, अरविंद चव्हान, संजय मेश्राम, चंद्रशेखर बडोले, गंगोत्री बडोले, नामदेव नेवारे, सत्यपाल वलथरे, आकाश कोरेवार, करणं मेश्राम, सुरज रामटेके सह अनेक येशू ख्रिस्त प्रेमी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते केक कापून यावेळी येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.