गावातील एकात्मता जोपासणारे घटक म्हणजे नाटक : महेंद्र ब्राम्हणवाडे

125

– जय किसान नाट्य कला मंडळाच्या वतीने मौशिखांब येथे नाट्यप्रयोगाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नाटक हे समाज सुधारणेचे माध्यम असून अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकून समाजप्रबोधनाचा काम केल्या जाते. या माध्यमातून गावातील लोक एकत्रित येत असतात व त्यातूनच खरा एकोपा निर्माण केल्या जातो, असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले. ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी जय किसान नाट्य कला मंडळाच्या वतीने महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा सत्कार करण्यात आला. सोबत कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खोये, मुख्य अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेसचे सचिव तथा निवडणूक सल्लागार सुनील चडगुलवार, गौरव एनप्रेद्दीवार, विपुल एलट्टीवार, कुणाल ताजने यांच्यासह मोठ्या प्रमाणात नाटकाचे रसिक व श्रोते यावेळी उपस्थित होते.