कुरखेडा येेथे शिवसेना – कांँग्रेस युती उमेदवारांच्या प्रचारार्थ काढली प्रचार रॅली

144

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कुरखेडा नगरपंचायत निवडणुकीतील शिवसेना – काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ 19 डिसेंबर रोजी कुरखेडा येथे प्रचार रॅली काढण्यात आली. कुरखेडा शहराचा सर्वांगीण विकास साधून चेहरामोहरा बदलविण्यासाठी शिवसेना – काँँग्रेस युतीच्या उमेदवारांंना विजय करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंदसिंह चंदेल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पााटील नाट, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, कुरखेडा तालुका कांग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, प्रल्हाद कराडे, मजी जिल्हा परिषद सभापती निरंजनी ताई चंदेल, युवती सेना पदााधिकारी उमाताई चंदेल, नंदुजी चावला, अशोक इंदुरकर, राकेश सहारे, दसरथ लाडे, यादवजी लोहबरे, स्वप्निल खांडरे, विकास प्रधान, अशोक इंदुरकर, सोनू भटकर, संजय देशमुख, विजय पुष्तोडे, लंकेश नंदनवार, चंदू नंदनवार, आशीष चुधरी, खुशल बंसोड़, रसीद खान आदींनी केले आहे. या प्रचार रॅलीमध्ये शिवसैनिक, व काँँग्रेस कार्यकर्ते युवासैनिक, महिला आघाडी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.