कुरखेडा शहराच्या विकासासाठी सेना- काँग्रेस उमेदवारांना विजयी करा

119

– शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कुरखेडा शहराच्या विकासासाठी शिवसेना – काँँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आशीष गोपाळराव काळे, कांताबाई गजानन मठ्ठे, जयन्द्रसिंह बजरंगसिंह चंदेल, अशोक काशीराम कंगाले, अनिता राजेंद्र बोरकर, कांताबाई त्र्यम्बक मेश्राम, पुंडलिक राजाराम देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंदसिंह चंदेल, सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, माजी जिल्हा परिषद सभापती निरंजनीताई चंदेल, अशोक इंदुरकर, सोनू भटकर, संजय देशमुख, विजय पुस्तोडे, लंकेश नंदनवार, चंदू नंदनवार, आशीष चुधरी, खुशाल बंसोड़, रसीद खान यांनी केले आहे. शिवसेना – काँँग्रेस महाविकास आघाडी उमेदवारांचा 17 डिसेंबरला प्रचार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडीचे पदाधिकारीी उपस्थित होते.