समाज बांधवांंनी संतांचे आचार, विचार आणि संस्कृती जोपासावी : नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

79

– श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तेली समाज मेळावा व उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : समाजाला पुढे न्यायचे असेल तर समाज एकजूट झाला पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपला विचार मोठा केला तर समाज मोठा होईल. मेळाव्यामध्ये युवा पिढीने पुढे येऊन प्रत्येकांनी स्वत:चे विचार मांडावे. तेली समाज हा संख्येने मोठा असल्याने मेळाव्याच्या माध्यमातून वधू – वरांचा परिचय होतो व बरेच लग्न जुळवून येण्यास मदत होते. तेली समाज बांधवांनी संतांचे आचार, विचार आणि संस्कृती जोपासावी, असे प्रतिपादन नवेगाव (कॉम्प्लेक्स) गडचिरोली येथे श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुउद्देशीय संस्था गडचिरोलीद्वारा आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव तेली समाज मेळावा व उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी तेली समाज बांधवांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष योगीताताई पिपरे बोलत होत्या.
मेळाव्यामध्ये १०८ वधू-वरांनी आपला परिचय दिला. तसेच सामाजिक कार्यकर्ते गुणवंतांचा नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुद्देशीय संस्था गडचिरोलीच्या दिनदर्शिकेचे व स्मर्णिकाचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाला श्री. संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहु. संस्थाचे अध्यक्ष भगवानजी टेकाम, माजी आमदार देवरावजी भांडेकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा (उत्तर) जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे, प्राचार्य विठ्ठल निखुुरे, प्रभाताई भांडेकर, प्रभाकर वासेकर, किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे, बलवंत लाकडे, लीलाधर भरडकर, अभिनव लाकडे, रामेशजी भुरसे, दिनेश लाकडे, लताताई कोलते, वैष्णवीताई नैताम, अर्चना कोलते, विनोद नागोसे, मंगेश भरडकर, घनश्याम लाकडे, कवडूजी समर्थ, रवींद्र ठाकरे, जगदीश्वर ठाकरे, गजानन ठाकरे, नीलकंठ ठाकरे, जीवनदास कोलते, दिलीप सहारे, कल्पना खांडखुरे व मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रियंका ठाकरे हिने केले तर वेनुदास सहारे यांनी आभार मानले.