विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा झाडीपट्टी रंगभूमीला नवी दिशा देणारा असुन या जिल्ह्यात प्राचिन काळापासून दंडार, टिपरी नृत्याची दंडार, नाटक, तमाशा व लोककला जोपासल्या जात आहेत. या माध्यमातून नेहमीच मनोरंजनाबरोबर समाजप्रबोधन देखील होत आलेला आहे. पण हल्लीच्या काळात TV, संगणक, मोबाईल आणि त्यावर येणारे चित्रपट ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या लोककला कुठे तरी लोप होताना दिसत आहे. परंतु नवयुग नाट्य कला मंडळ खरपुंडीच्या समुहाने आज ही लोकसंस्कृती टिकवण्याचा काम केला आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. ते खरपुंडी येथे आयोजित नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा काँग्रेस महासचिव घनश्याम वाढई, कमलेश खोब्रागडे, टिकले, नैताम, विपुल येलेटीवार, कुणाल ताजने आदी उपस्थित होते.