भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल मानव जातीसाठी केलेले कार्य चिरंतन आणि वंदनीय आहे : महेंद्र ब्राम्हणवाडे

81

– जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल मानव जातीसाठी केलेले कार्य चिरंतन आणि वंदनीय आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, बहुजन समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग असे अनेक कार्य बाबासाहेबांनी आपल्या जीवनात केले व समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार बाबासाहेबांनी केला आणि त्यांचे हेच विचार आम्हाला व येणाऱ्या पिढीसाठी नेहमीच पथदर्शी ठरतील, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष भावना वानखेडे, उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, महासचिव समशेरखा पठाण, महासचिव घनश्याम वाढई, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, शहर कार्याध्यक्ष आशिष कांबळी, अनुसूचित महिला अध्यक्ष अर्पणा खेवले, बाबुराव गडसुलवार, प्रतीक बारसिंगे, गौरव एनप्रेड्डीवार, विपुल एलट्टीवार, कुणाल ताजने, समीर ताजने, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, संजय वानखेडे, राकेश सुरजागडे, साहिल वडेट्टीवार, कल्पना नंदेश्वर, पद्मा पशुला, पुष्पा कुमरे, लताताई मुरकुटे, नीता वडेट्टीवार, पौर्णिमा भडके, सुवर्णा उराडे, दीपा मालवणकर, वर्षा गुलदेवकर, सुनीता रायपूरकर, विद्या कांबळे, आरती कांगाले, सुधा नागापुरे, संगीता सोनुले आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.