कुरखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना – काँँग्रेस आघाडीतर्फे शिवसेना व काँगेसचे आठ उमेदवारी अर्ज दाखल

107

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कुरखेडा नगरंपंचायत निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उमेदवारांनी शेकडो नागरिक व शिवसानिकांंच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, सहसंपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार, उपजिल्हाप्रमुख भरत जोशी, माजी नगराध्यक्ष महेंद्र मोहबंशी, आशिष काळे, पुंडलिक देशमुख, विजय पुस्तोडे, सोनू भट्टड, माजी सभापती निरंजनी चंदेल, युवतीसेना जिल्हाध्यक्ष उमा चंदेल, अशोक कंगाली, जयेंद्र चंदेल, निकेश भेले, राकेश चव्हाण, चंदू नाकतोडे, सुधाकर भेंडे, आशिष चुधरी, रशीद पठाण, चंदू नंदनवार, प्रशांत हटवार, साजो सय्यद, भावेश मुंगणकर, अभी बोरकुटे, अश्विनी पिंपळकर, अनिता बोरकर, कांता मेश्राम, कांता मटे, शारदा गाठादे, विटाबाई लाकडे, सरिता लाकडे, लाली चंदेल यांच्यासह शेकडो शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. अर्ज सादर करताना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, सहसंपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार, महेंद्र मोहबंसी, आशिष काळे, जयेंद्र चंदेल, राकेश चाव्हन, अशोक कंगाली उपस्थित होते.