Home गडचिरोली महाराष्ट्र दिनानिमित्त जि. प. उच्च प्राथमिक शाळा हरांबा येथे ध्वजारोहण कार्यक्रम साजरा

महाराष्ट्र दिनानिमित्त जि. प. उच्च प्राथमिक शाळा हरांबा येथे ध्वजारोहण कार्यक्रम साजरा

166
Oplus_131072

– ग्रामपंचायततर्फे शाळेला प्रोजेक्टर संच व इतर वस्तुंची दिली भेट

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : 1 मे 2024 ला 65 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त सावली तालुक्यातील  जि. प. उच्च प्राथमिक शाळा हरांबा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायत हरांबातर्फे 15 व्या वित्त आयोगातून शाळेला प्रोजेक्टर संच, संगणक, साऊंड बॉक्स, ऑफिस चेअर, ऑफिस कपाट वाचनालय कपाट ई. वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या. सोबतच यावर्षी 3 इमारतींना बाला पेंटिंग करून देण्यात आले. याकरिता शाळेतर्फे ग्रामपंचायतचे विशेष आभार मानण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचे निकाल व गुणपत्रिकेचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रविण संतोषवार, ग्रा. पं. सदस्य हर्षकुमार डोईजड, अंगणवाडी सेविका, मदतनीस व शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!