Home गडचिरोली सशक्त, स्वावलंबी व विकसित भारत बनविण्याचा संकल्प घेऊन अभियान पूर्ण करावे :...

सशक्त, स्वावलंबी व विकसित भारत बनविण्याचा संकल्प घेऊन अभियान पूर्ण करावे : इंजि. प्रमोदजी पिपरे

102

– भाजपा जिल्हा गडचिरोलीची ‘गाव चलो अभियान’ कार्यशाळा संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला. गरीब कल्याण, महिला सशक्तीकरण, देशाची अंतर्गत आणि बाहय सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीकरिता केंद्र व राज्य सरकारची येशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा पदाधिकारी यांनी गाव चलो अभियानात सहभागी होऊन सशक्त, स्वावलंबी व विकसित भारत बनविण्याचा संकल्प घेऊन प्रत्येक गावागावात जाऊन गाव चलो अभियान पूर्ण करावे, असे आवाहन लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन धानोरा रोडवरील महाराजा सेलिब्रेशन सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोदजी पिपरे बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन विधान परिषद सदस्य आमदार डॉ. रामदासजी आंबडकर, खासदार अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे, प्रदेश सदस्य रविंद्रजी ओल्लारवार, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, महामंत्री प्रकाशजी गेडाम, किसान आघाडी प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे,bजिल्हा उपाध्यक्ष गजानन येनगंधलवार, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, तालुका अध्यक्ष विलास भांडेकर, आनंद भांडेकर, गोवर्धन चव्हाण, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे तसेच जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष,महामंत्री, सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, सुपर वारीयर्स,बुथ पालक व बुथ प्रमुख उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे यांनी केले.

error: Content is protected !!