Home गडचिरोली बूथ पालकांनी जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता : आमदार कृष्णा गजबे

बूथ पालकांनी जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता : आमदार कृष्णा गजबे

122

– आरमोरी विधानसभा क्षेत्रातील बूथ पालकांचा मेळावा देसाईगंज येथे संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

देसाईगंज : बुथ पालकांनी आपला बुथ कसा मजबूत होईल याकडे काटकसरीने लक्ष द्यावे. ज्याचे कार्यकर्ते मजबूत त्याचा बूथ मजबूत. आपण महाविजय २०२४ लक्षात घेऊन प्रत्येक बुथ पालकांनी जबाबदारीने कार्य करावे. भारतीय जनता पार्टीने प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये १०० वॉरियर्स (बूथ पालक) नेमलेले असून हे बूथ पालक भविष्यातील येणाऱ्या निवडणुकीत विजयाचे शिल्पकार ठरणार असल्याने आपल्यावरील कामाची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करावे, असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंज येथील सिंधू भवन येथे आयोजित विधानसभा क्षेत्राच्या बूथ पालकांच्या मेळाव्याला संबोधित करताना केले.

यावेळी प्रामुख्याने मंचावर खासदार अशोक नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, सहकार महर्षी तथा आरमोरी विधानसभा संयोजक प्रकाशजी सा. पोरेड़्डीवार, लोकसभेचे संयोजक किसन नागदेवे, लोकसभा संयोजक विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडीचे बबलुभाई हुसैनी, जिल्हाध्यक्ष अनु.जातीचे ॲड. उमेश वालदे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, वडसा तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, कोरची तालुकाध्यक्ष नसरूद्दीन भामानी, जिल्हा सचिव गणपत सोनकुसरे, शहराध्यक्ष सचिन खरकाटे उपस्थित होते.

आमदार गजबे पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या पक्षाचे ध्येय धोरणे हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवावे. बुथ समित्या स्थापन कराव्यात. बुथ पन्ना समिती तयार कराव्यात, विश्वकर्मा योजनेचे फायदे जनतेला समजवून सांगा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व बूथ पालक व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!