Home गडचिरोली खा. अशोक नेते यांची सेवानिवृत्त कर्मचारी कान्हुजी लोहंबरे यांच्या पासष्टीपूर्ती वाढदिवस सोहळ्याला...

खा. अशोक नेते यांची सेवानिवृत्त कर्मचारी कान्हुजी लोहंबरे यांच्या पासष्टीपूर्ती वाढदिवस सोहळ्याला सदिच्छा भेट

119

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली येथील शासकीय सेवानिवृत्त तथा सामाजिक नेते कान्हुजी पांडुरंग लोहंबरे यांनी आपल्या जिवनात सामाजिक कार्याची जाण ठेऊन कार्य केले. आजचा दिवस त्यांच्या जिवनांतील अतिशय अविस्मरणीय आठवणीचा क्षण म्हणून कॅम्प एरियातील गडचिरोली येथे ६५ वा पासष्टीपूर्ती वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वाढदिवस कार्यक्रम समारंभाला खासदार अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून कान्हुजी लोहंबरे यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत त्यांना सुख समृद्ध, आरोग्यदायी, आनंददायी जीवन लाभो, अशा याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार अशोक नेते व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचे लोहंबरे परिवारातर्फे शाल, श्रीफळ देऊन मानसन्मान करण्यात आले. याप्रसंगी खासदार अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, डॉ. मिलींद नरोटे, माजी जि. प. अध्यक्ष समया पसुला तसेच मोठ्या संख्येने वाढदिवसाला मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!