Home गडचिरोली आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन

आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन

148

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देसाईगंज शहरातील पटेल वार्ड येथील दुर्गा माता मंदिर येथे नगर परिषद अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 10 लक्ष रूपयांचा निधी सभा मंडपाकरिता मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांचे हस्ते 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आले.

यावेळी आमदार कृष्णाजी गजबे यांनी पटेल वॉर्ड येथील दुर्गा मातेचे दर्शन घेऊन आरमोरी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक सुखी संपन्न व्हावेत, अशी मा दुर्गा देवीच्या चरणी प्रार्थना केली. याप्रसंगी मोहनभाऊ वैद्य, माजी नगरसेवक गणेश फाफट, अतुल डांगे, हेमंत पटेल, भोलाभाई पटेल, गोपालजी महाराज, नसीम पठाण व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!