Home गडचिरोली राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोद्दूमडगू येथील कार्यकर्त्यांनी केला भाजपात...

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोद्दूमडगू येथील कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

192

– युवा वर्गात वाढत आहे राजेंची लोकप्रियता

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली :  अहेरी तालुक्यातील आलापल्ली लगतच्या नागेपल्ली ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक ३ मधील मोद्दुमडगू या गावातील अनेक महिला तथा युवकांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवत नुकतेच मोद्दुमडगू येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपात अधिकृत प्रवेश केला. यावेळी राजेंनी भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सर्वांचे स्वागत केले. विविध पक्षांचे कार्यकर्ते सातत्याने भाजपात येत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही भाजपात प्रवेश केला आहे. तुमचा विश्वासघात मी कदापी होऊ देणार नाही. तुमच्या गावांतील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राजेंनी यावेळी केले. यावर ‘राजे साहेब आगे बडो, हम तुम्हारे साथ है’ अशी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी राजेंना जोरदार दाद दिली.

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे शांत व संयमी स्वभाव, प्रत्येकाशी आपुलकीने बोलण्याचा तथा गरजूला मदत करण्याचा गुण, विकासाची दूरदृष्टी ह्यामुळे युवा वर्गात राजेंची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यामुळे संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रातून राजेंचा युवा नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत सातत्याने प्रवेश होत आहे. तसेच राजेंसाठी सकारात्मक वातावरण असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!