Home गडचिरोली कॅबिनेट मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतला अन्न व औषध प्रशासन विभागाचा...

कॅबिनेट मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतला अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा

129

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कॅबिनेट मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री म्हणून प्रभार घेतल्यानंतर शनिवारी प्रथमच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता रविवारी त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित अन्न मिळण्याकरिता विशेष मोहीम आखून कारवाया करण्याच्या सूचना ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी दिल्या. तसेच घाऊक व किरकोळ अन्न व औषध विक्रेत्यांची नियमितपणे तपासणी करण्याची सूचनाही त्यांनी दिल्या.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे गडचिरोली येथील कार्यालय सध्या बॅरेकमधील एका कक्षात असून या कार्यालयाकरिता जिल्हा परिषदेच्या जवाहर भवनासमोर स्वतंत्र कार्यालयासाठी जागा मंजूर झाली आहे. त्या जागेची पाहणी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली व इमारत बांधकामाकरिता आवश्यक निधी मंत्रालय स्तरावरून त्वरित उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी सांगितले.

याप्रसंगी गडचिरोलीचे सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे, सहायक आयुक्त (मुंबई) उल्हास इंगावले, सहायक आयुक्त (औषधे) नीरज लोहकरे, औषध निरीक्षक नालंदा उरकुडे, अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम, तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!