विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील कच्चा लोहखनिज काढताना पहाडीवरून एक वाहन खाली कोसळून बोलेरो वाहनावर आदळून झालेल्या अपघातात बोलेरोमधील एका तरुण अभियंत्यासह दोन मजूर ठार तर दोनजण जखमी झाले. त्या जखमींना अहेरी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. सदर घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
या अपघातात अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील सोनल रामगिरवार या तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला असून त्याचे एक वर्षापूर्वी लग्न झाल्याने रामगिरवार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या अपघातातील मृत्यू पावलेले दोन मजूर हरियाणा राज्यातील असून शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह मूळ गावी रवाना केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, लोहखनिजाचे उत्खनन करणाऱ्या लॅायड्स मेटल्स कंपनीकडून मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.