मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नंदिनी इंडस्ट्रीजच्या रिताली मस्के यांना ५० लाखांचा धनादेश प्रदान

55

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे सिमेंट विटा निर्मिती उद्योगाला सुरुवात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १० जुलै : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गडचिरोली एमआयडीसीमध्ये सिमेंट विटा निर्मितीचाउद्योग सुरू करण्यासाठी नंदिनी इंडस्ट्रीजच्या सौ. रिताली दिलीप मस्के यांना ५० लक्ष रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, कॅबिनेट मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते व माजी मंत्री शोभाताई फडणवीस, खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाधिकारी संजयजी मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पलजी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वादजी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या मेक इन गडचिरोली अंतर्गत सदर उद्योगाला चालना मिळाली असून त्यांच्या यशस्वी प्रयत्नांतून या उद्योगाची सुरुवात झाली असल्याची प्रतिक्रिया नंदिनी इंडस्ट्रीच्या संचालिका सौ. रिताली दिलीप मस्के यांनी यावेळी दिली. शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल मा. जिल्हाधीकारी, बँक ऑफ इंडियाचे मा. व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, तसेच राज्य सरकारचे यावेळी त्यांनी आभार मानले.