देशातल्या सर्वात मोठ्या निर्माणाधिन कोनसरी पोलाद कारखान्याला जनतेने सहकार्य करावे

26

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे जिल्हावासियांना आवाहन

– कोनसरी पोलाद कारखान्याविषयी कोनसरी येथे पर्यावरण विषयक जनसुनावणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १० जुलै : गडचिरोली येथे सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकल्पातून कोनसरी येथे देशातील सर्वात मोठा पोलाद कारखाना तयार होत असून जिल्ह्यातील लाखो बेरोजगारांना रोजगार देणारा हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार असल्याने गडचिरोली जिल्हा वासियांनी त्याला सहकार्य करावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी कोनसरी प्रकल्पाविषयी झालेल्या पर्यावरण विषयक जन सुनावणीच्या प्रसंगी आलेल्या जनतेला मार्गदर्शन करताना केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय चंद्रपूरच्या वतीने मे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड प्लॉट नंबर १ एमआयडीसी कोनसरी च्या फिल्टर्स फिल्टरेशन युनिट, आयर्न प्लॅनेट प्लान्ट च्या स्पोंज आयर्न विस्तारीकरण प्रकल्पाच्या उभारणीबाबतच्या पर्यावरण विषयक जनसुनावणीचे आयोजन कोनसरी येथे करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय चंद्रपूरचे अधिकारी, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे अधिकारी यांच्यासह, सुरजागड, कोनसरी प्रकल्प परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा प्रकल्प जिल्ह्यात होत आहे. कोनसरी प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार असून या पोलाद कारखान्याच्या कामाचा बराचसा भाग पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे लवकरच हा कारखाना सुरू होणार असून त्यातून जिल्ह्यातील नवतरुणांना बेरोजगारांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे. आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी हा मोठा आर्थिक स्तोत्र ठरणार असून जिल्ह्यातील जनतेने त्यासाठी यथायोग्य सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे.