Home गडचिरोली राजाराम येथील शाळेत नवागतांचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवागत

राजाराम येथील शाळेत नवागतांचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवागत

95

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी, २ जुलै २०२३ : अहेरी पंचायत समिती अतंर्गत येत असलेल्या राजाराम येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत काल, १ जुलै रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या गणवेश व पाठ्यपुस्तक व पुष्पगुच्छा देवून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते नवागता विद्यार्थ्यांचे पुष्गुच्छ देवून स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्यासहित अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, जि. प. सदस्य अजय नैताम, शाळा व्यवस्थापण समितीचे उपाध्यक्ष मीना सड़मेक, राजाराम ग्राम पंचायत, माजी सरपंचा जोतीताई जुमानके, माजी उपसरपंच संजय पोरतेट, महेश्वरी बत्तूलवार, सुरेश सोयाम, रमेश पोरतेट, अरविंद परकिवार, दिपक अर्का, नारायण चालुरकर, सतीश निष्टूरी, केंद्र प्रमुख पुसालवार, मुख्याध्यापक पस्पूनवार, ग्रामसेवक झाडे, शिक्षक श्री. जुमानके, मडावी, चुदरी, आत्राम सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!