Home गडचिरोली राजाराम येथील जि. प. शाळेत नवीन वर्गखोलीचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

राजाराम येथील जि. प. शाळेत नवीन वर्गखोलीचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

143

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी, १ जुलै २०२३ : तालुक्यातील राजाराम येथील जि. प. शाळेत नवीन वर्गखोलीचे उद्घाटन आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आहे.

अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत राजाराम येथे जिल्हा परिषद केंद्र शाळा असून इयत्ता १ ते ७ वी पर्यंत शिक्षण असून २०० च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षापासून वर्गखोल्यांची कमतरता असून याकडे दुर्लक्ष केल्या जात होती. दरम्यान, राजाराम येथे केन्द्रस्तरीय बालक्रिडा सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. त्याअनुषंगाने माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार आले होते. तेव्हा माजी सभापती भास्कर तलांडे यांनी नवीन वर्गखोलीची मागणी केली. त्याक्षणी जि. प. माजी अध्यक्ष यांनी शब्द दिली की, मी जिल्हा परिषदेच्या निधीतून शाळेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करू देऊ. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र स्थानिक राजकारणामुळे सदर वर्गखोली झाली नव्हती व निधी परत करण्यात आला. पण पुन्हा सदर नवीन वर्गखोली आवश्यक असल्याचं माजी सभापती यांनी विषय रेटून धरला. त्यामुळे आपण एक नवीन वर्गखोलीसाठी निधी देवून मंजूर केले होते. सदर वर्ग खोलीचे बांधकाम पूर्ण झाले. १ जुलैपासून शाळा सुरू होत असल्याने या वर्गखोलीचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, जि. प. सदस्य अजय नैताम, शाळा व्यवस्थापण समितीचे उपाध्यक्ष मीना सड़मेक, राजाराम ग्रामपंचायत माजी सरपंचा जोतीताई जुमानके, माजी उपसरपंच संजय पोरतेट, महेश्वरी बत्तूलवार, सुरेश सोयाम, रमेश पोरतेट, अरविंद परकिवार, दिपक अर्का, नारायण चालुरकर, सतीश निष्टूरी यांच्यासह केंद्र प्रमुख पुसालवार, मुख्याध्यापक पस्पूनवार, ग्रामसेवक झाडे, शिक्षक जुमानके, मडावी, चुदरी, आत्राम व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!