जेसाभाई मोटवानी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

35

विदर्भ क्रांती न्यूज

देसाईगंज, १ जुलै २०२३ : आज 1 जुलै 2023 रोजी देसाईगंज (वडसा) येथे माजी नगराध्यक्ष व काँग्रेस नेते जेसाभाई मोटवानी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सभेत मार्गदर्शन करताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी जेसाभाई यांना वाढदिवसाच्या व निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, माजी सभापती परसरामजी टिकले, माजी उपसभापती नितीनजी राऊत, ओबीसी सेलचे सचिव मनोज ढोरे, युवक काँग्रेसचे पिंकू बावणे, मुकेशजी वाघाडे व युवक काँग्रेसचे पंकज चहांदे आदी उपस्थित होते.