खा. अशोकजी नेते व आ. रामदासजी आंबटकर यांच्या वाढदिवसानिमित्त चामोर्शीत विविध साहित्याचे वाटप

49

– गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी, १ जुलै २०२३ : जनसामान्यांच्या कल्याणासाठी राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य करणारे गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व जनमानसात सामान्य माणसाशी नाळ जोडून समाजकार्यात अग्रेसर असलेले विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार  डॉ. देवराव होळी यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा चामोर्शी, जि. प. प्राथ. शाळा दहेगाव, जि. प. कन्या शाळा चामोर्शी येथे नोट बुक, पेन आदी विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख, भाजपा प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, तालुका उपाध्यक्ष जयराम चलाख, तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे, युमो तालुका महामंत्री दिपक वासेकर, तालुका युमो रामचंद्र वरवाडे, राजु धोडरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी या साहित्याचा योग्य वापर करून अध्यापन कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करावा. अध्यापनात सातत्य व चिकाटी कायम ठेवून गुणवत्ता यादीत जिल्ह्याचा नाव लौकिक करावा, असे आवाहन यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी यांनी केले.