विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीचे शारीरीक व मैदाणी चाचणी ६ सप्टेंबर ते ८ सप्टेंबरच्या दरम्यान घेण्यात आली. त्यामध्ये पात्र उमेदावरांकरिता राहण्याचे निवासव भोजनव्यवस्था करण्यात आली. त्यामध्ये दुर्गम भागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, कोरची व इरतत्र भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. याकरिता जिल्हा मुख्यालयात ज्यांची व्यवस्था होवू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना छोटासा मदतीचा हात राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांना निवासाची व्यवस्था पटेल मंगल कार्यालय येते करुन देण्यात आली होती. शंभराहून अधिक मुला-मुलींनी निवास व भोजन व्यवस्थेत उपस्थित झाले. सलग तीन दिवस निवास व्यवस्थेपासून पोलीस मुख्यालयापर्यंत सोडण्याकरिता बसची व्यवस्था करुन देण्यात आली होती.
यावेळी अमीत वासेकर घोट, अनिकेत अल्लेवार घोट, अतुल पालपल्लीवार घोट, मीलींद मोहुर्ले घोट, हरिमन दुबलेवार मोहुर्ली, निलेश वासेकर निमडर टोला, प्रताप आत्राम गुंडापल्ली, संकेत मोहुर्ले वडसा, मनोज कोंडा देचलीपेठा, अनील कोंडावार, बामणी (सिरोंचा), वृषभ कुथे वडसा, आशीष चंदनखेडे राजाराम, समीर नायर रांगी, अमन वेलादी रेखेगाव, जितेंद्र ठाकरे आरमोरी, तुषार चिलांगे आरमोरी, पुरुषोत्तम दोनाडकर आरमोरी, लोकेश डोनाले वडसा, राहुल बोरु मुलचेरा, अमोल पन्नापवार ठाकरी, रोहीत धुगलोत मुलचेरा, रोशन धुगलोत मुलचेरा, नलीना चामट वडसा, आरती मेश्राम वडसा, शिल्पा वाढई मगरटोला, नागेश दोनाडकर वडसा, गौरव नाहामुर्ते मरारटोला, शितल कावळे रेगडी, पुनम बुध्दे कोकडी, संकेत बुध्दे कोकडी, रश्मी घुगलोत कोपरअल्ली, रविंद्र घुगलोत आदी उमेदवारांना मदतीचा हात मिळाला. या सामाजिक उपक्रम सुरू असताना जिल्हा पोलीस भरती शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया मध्ये सहभागी उमेदवार सोबत प्रत्यक्ष भेटून दररोज हितगुज आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी जी.प. अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम, जिल्हाअध्यक्ष रवींद्र वासेकर, शहर अध्यक्ष विजय गोरडवार, युवक प्रदेश सरचिटणीस प्रा रिंकू पापडकर सातत्याने विचारपूस करून नियोजनावर लक्ष ठेवून होते.
यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष लिलाधर भरडकर, विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके, शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, तालुका अध्यक्ष श्रीधर येरावार, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष चेतन पेंदाम, हिमांशु Kharwade, जिल्हा संघटक रंजीत रामटेके, संजय शींगाडे, कपील बागडे, योगेश नांदगाये, कीशोर बावणे, संकेत जनगणवार, चेतन गड्डेवार, लकेश सेलोठे, गणेश बावणे, रीतीक डोंगरे, मुझाहीत पठाण, दीपक नंदेश्वर आदींनी सहकार्य केले.




