पोटेगाव आश्रमशाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

96

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षिका प्रमिला दहागावकर, पदवीधर प्राथमिक शिक्षिका मीनल शेट्टीवार, प्राथमिक शिक्षिका जयश्री रामगीरवार, अधिक्षिका एल. आर. शंभरकर, विद्यार्थिनी करिश्मा आतला उपस्थित होते.
यावेळी महिलांचे अधिकार, हक्क यांची जाणीव करून देऊन जीवनातील जडणघडणीत व देशाच्या विकासासाठी महिलांचे महत्त्व, सहभाग व योगदान याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या औचित्य साधून यावेळी उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जेष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी माध्यमिक शिक्षक डॉ. एस.डी. गोट्टमवार, के. पी. मेश्राम, प्राथमिक शिक्षक व्ही. एस. देसु, व्ही. एम. नैताम, एन. पी. नेवारे, अधीक्षक एस. आर. जाधव, कला शिक्षक प्रमोद पवार, संगणक शिक्षक रजत बारई, कर्मचारी व विद्यार्थ्यानी सहकार्य केले.