केन्द्र सरकारच्या योजनांची आढावा घेणाऱ्या दिशा समितीची जिल्हा बैठक 11 मार्चला

68

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केन्द्र सरकारच्या सर्व योजनांचा आढावा घेणारी जिल्हा दक्षता, सनियंत्रण व समन्वय (दिशा) समितीची जिल्हा बैठक खा. अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन काम्पलेक्स गडचिरोली येथे 11 मार्च 2022 ला 12 वाजता होणार आहे.
या दिशा समितीचे जिल्हास्तरीय सचिव मा. जिल्हाधिकारी गडचिरोली आहेत. बैठकीत मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, मा. मुख्य कार्यपालन अधिकारी, वनविभागाचे CCF, DFO, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व बँकांचे अधिकारी, नँशनल हायवेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या विविध समस्या असतील तर मला मो. न. 9423422588 या वर वाट्सअप करावे किंवा फोन करुन समस्या अवगत करुन दिल्यास आपणास न्याय देण्याकरिता आम्हाला सोईचे होईल, असे प्रकाश गेडाम, जिल्हा सदस्य, जिल्हा दक्षता, सनियंत्रण व समन्वय (दिशा) समिती गडचिरोली यांनी कळविले आहे.