गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या नरेंद्र मोदींचा निषेध

87

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केले. ते अतिशय दुर्भाग्यपूर्ण असून ही बाब महाराष्ट्राचा व महाराष्ट्रातील सर्व जनेतचा घोर अपमान करणारी आहे. वास्तविक कोरोनाने सम्पूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलेला असताना ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम घेऊन मोदींनी लाखोंची गर्दी केली आणि त्या माध्यमातून कोरोना देशात पसरवला. मोदींनी फक्त ट्रम्पचा कार्यक्रम घेण्याकरिता विमानतळ बंद केली नाहीत. कोरोनाने संकट असतानाही बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ राज्यात निवडणूक घेण्यात आल्या. खऱ्याअर्थाने कोरोना पसरवण्याचे पाप हे मोदी सरकारनेच केले आहे. मात्र उत्तर प्रदेशमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, स्वतःचे पाप महाराष्ट्रावर लादण्याचा केविलवाणा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वक्तव्यातून केला आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जनता हे कधीही खपवून घेणार नसल्याने जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने प्रधानमंत्री मोदींच्या या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी गडचिरोली येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात “शर्म करो मोदी” आंदोलन करत मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हा कार्याध्यक्ष हसनअली गिलानी, प्रदेश महासचिव डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, शहर अध्यक्ष सतिश विधाते, सोशल मीडिया प्रदेश महासचिव नंदूभाऊ वाईलकर, महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाालीताई पंदीलवार, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, ता. अध्यक्ष नेताजी गावतुरे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, अपर्णा खेवले, संजय पंदीलवार, हरबाजी मोरे, बी. आर. मुद्दमवार, बाळासाहेब आखाडे, संजय चन्ने, समय्या पसुला, वसंत राऊत, कृष्णा झंजाळ, तौफिक शेख, चारुदत्त पोहणे, जितेंद्र मुनघाटे, आशीष कामडी, माजिद सय्यद, घनश्याम मुरवतकर, मधुकर नैताम, अनिल कोठारे, अरुण मोहोड, भरत येरने, रुपेश टिकले, ढिवरु मेश्राम, अजय भांडेकर, सुदर्शन उंदिरवाडे, नामदेव उडाण, किशोर भांडेकर, जनार्धन भांडेकर, अविनाश कुनघाडकर, संतोष गव्हारे, अब्दुलभाई पंजवाणी, फिरोज भाऊ हुद्दा, राकेश रत्नावार, वसंत सातपुते, प्रतीक बारसिंगे, समीर ताजने, जावेद खान, जीवनदास मेश्राम, मिलिंद बारसागडे, गिरीष खाडिलकर, अरुण पुण्यपरेड्डीवार, दीपक रामने, अनिल भांडेकर, मनोज वनमाळी, नरेंद्र सोरते, नदीम नाथानी, संजय वैद्य, विपुल येलेट्टीवार, कुणाल ताजने, सुनीता रायपुरे, लता ढोक, वंदना ढोके, विद्या कांबळे, आशा मेश्राम, कल्पना नंदेश्वर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.