दर्शनी (माल) फाट्यावर डग्गा वाहनाला भीषण अपघात

68

– अपघातग्रस्त जखमी वाहन चालकास आमदार डॉ. देेेवरावजी होळी यांची तत्काळ मदत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तालुक्यातील दर्शनी (माल) येथील चामोर्शी रोडवरील फाट्यावर 10 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजता मौजा खरपुंडी निवासी वाहन क्रमांक mh 33 t 3028 वाहन चालक प्रदीप चलाख हा चामोर्शीकडून गडचिरोलीकडे जात होता. वाहन चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले व तळोधी उपसा सिंचन योजनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर्शनी (माल) फाट्यासमोरील ब्यारेज बोर्डला जोरदार धडक दिली व वाहन पलटी झाली. यावेळी मागून गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. देवराव होळी गडचिरोली येथे जात होते. यावेळी आमदार डॉ. होळी यांनी वेळ न दवडता आपली गाडी थांबवून आधी पलटी झालेल्या वाहनात अडकलेल्या वाहन चालकास बाहेर काढून पाणी पाजले व तत्काळ एकशे आठ क्रमांकाच्या अंबुलेंसला पाचारण करून अपघाग्रस्त वाहन चालक यास अंब्युलेंस वाहनात टाकून
पाठविले. यावेळी गडचिरोली येथे कामानिमित्त निघालेले जिल्हा परिषद कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे हे सुध्दा उपस्थित झाले व अपघातग्रस्त वाहन चालक यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. यावेळी सदर अपघातग्रस्त ठिकाणी गडचिरोली व चामोर्शी येथे जाणारे- येणारे मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली होती.
यावेळी सदर अपघाताची माहिती आमदार जनसंपर्क कार्यालय येथून पोलीस पाटील गडचिरोली येथे कळवण्यात आली होती.