वालसरा येथे कुरुड – विसापूर जिल्हा परिषद सर्कल भाजपा बूथ प्रमुख व कार्यकर्ता मेळावा संपन्न

102

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कुरुड – विसापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी सर्कल बूथ प्रमुख व कार्यकर्ता मेळावा चामोर्शी तालुक्यातील वालसरा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, गडचिरोली विधानसभा क्षेत्र आमदार डॉ. देवरावजी होळी, संघटन महामंत्री रविभाऊ ओल्लालवार, जिल्हा परिषद कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे, भाजपा ज्येष्ठ नेते केशवराव भांडेकर, आदिवासी आघाडी नेते प्रकाश गेडाम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिताताई भांडेकर, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, पंचायत समिती सदस्य श्रीमती नरोटे, श्रीमती सातपुुते, विसापूर – कुरुड विसापूर क्षेत्राचे सर्कल प्रमुख मधुकरराव भांडेकर, शक्ती केंद्रप्रमुख रमेश नरोटे, विजय सातपुते, जानोजी बोधलकर, तसेच क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष म्हणून लाभलेले भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी शक्ती केंद्रप्रमुख व बुथ प्रमुख यांची जबाबदारी व काम कशाप्रकारे करायचे याबाबत मार्गदर्शन केले.