पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती : शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार

96

– पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरमाडी येथील शेकडो माता-भगिनींना वस्त्रभेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यात अतिमागासलेल्या गडचिरोली जिल्हयाच्या विकासाचा दृष्टीकोण डोळयासमोर ठेवून विकासपुरूष मा. ना. एकनाथजी शिंदे यांनी गडचिरोली जिल्हयाचे पालकत्व स्विकारले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांंच्या काळात जिल्हयात अनेक नाविण्यपुर्ण कामे मार्गी लागली असून जिल्हयाच्या विकासपर्वाची सुरूवात झाली आहे. विकासपुरूष मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नामुळे गडचिरोली जिल्हयाचे चित्र लवकरच पालटलेले दिसेल, असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंंद कात्रटवार यांनी केले.
राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गड़चिरोली जिल्हा संपर्क प्रमुख मा. किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने गडचिरोली तालुक्यातील मुरमाडी येथे माता-भगिनींना वस्त्रभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला उपस्थित माता -भगिनींना मार्गदर्शन करतांना अरविंद कात्रटवार पुढे म्हणाले, शिवसेना जनतेच्या मदतीसाठी धावून जाणारी सेना आहे. गोरगरीब जनतेच्या हितासाठी शिवसेना निर्माण झाली. शिवसेनेने ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे धोरण बाळगूण समाजकार्यावर अधिक भर दिला. शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख मा. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या कार्याचा आदर्श जोपासून शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. जनतेच्या कोणत्याही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी सर्वप्रथम शिवसैनिक पुढे येतो. एक शिवैसनिक म्हणून जनसेवेचे कार्य माझ्या हातून अविरत सुरू राहील.
मा. मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पालकमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्हयात विकासाची वाट सुरू झाली आहे. गोरगरीब जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. एवढेच नव्हे तर जिल्हयात लोह उद्योग निर्मितीचा कारखाना सुध्दा लवकरच सुरू होणार आहे. या लोह उद्योगामुळे जिल्हयातील हजारो सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हयात गेल्या अनेक वर्षापासून थंडबस्त्यात पडलेले कोटगल बॅरेजसह इतर सिंचन प्रकल्पाची कामे पालकमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊन दुबार पिके घेता येईल. मा. ना. शिंदे यांनी पालकमंत्री पदाची धुरा घेताच जिल्हयाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्या माध्यमातून विविध विकास कामे केली जात आहेत.
एक कट्टर शिवसैनिक तथा जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून मुरमाडी जि. प. क्षेत्रात ज्या समस्या असतील त्या समस्या मा. ना. पालकमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडून या भागाच्या विकासाला गती देण्यासाठी कटीबध्द राहीन, असे शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे म्हणाले, पालकमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना सहसंपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला वस्त्रभेट कार्यक्रम हा शिवसेनेच्या सामजिक उपक्रमाचा एक भाग आहे. शिवसेनेने नेहमीच समाजकार्यावर भर दिला आहे. पालकमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्यामुळे जिल्हयाच्या विकासाला गती मिळत आहे. जिल्हयाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेने सुध्दा शिवसेनेप्रती सहकार्याची भावना स्विकारावी, असे विलास कोडापे म्हणाले. कोणत्याही निवडणुका नसताना शिवसेनेच्या वतीने वस्त्र भेट कार्यक्रमातून सामाजिक बाधीलकीचे दर्शन घडविले आहे. असे सामाजिक कार्य फक्त शिवसेनाच करू शकते, असे भावउद्धगार अनेक माता-भगिनिनी यावेळी काढले. संपूर्ण मुरमाड़ी गाव यावेळी भगवामय झाले होते. गावात ठिकठिकाणी मा. ना. पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होल्डिंगस झडक़त होते. आपल्या घरासमोर अनेक माता-भगिनिनी रांगोळ्या काढून तशेच औक्षण करून शिवसेना पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद कात्रटवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, नवनाथ ऊके, संदीप भुरसे, गणेश दहेलकर, संदीप अलबनकर, गोपाल पानसे, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, राहुल सोरते, संजय शेंडे, काशीनाथ डोईजड, चंद्रभान नैताम, वासुदेव देशमुख, गिरिधर बोरकर, कावडूजी भुुसारी, मोरेश्वर कोडापे, यशवंत डोईजड, सचिन भुसारी, दिलीप कोहपरे, सूरज उइके, प्रशांत ठाकूूर, तुषार बोरकर, अनिल कोसमशीले, स्वप्निल ढोडरे, निरंजन लोहबरे, हरबाजी दाजगाये, नेपाल लोहबरे, महेश झोड़े, तानबा दाजगये, अविनाश झोड़े, हर्षल गेडाम, अक्षय तुमाराम, आकाश सोरते, निकु वाघमारे यांच्यासह गावातील शिवसैनिक तसेच गावकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.