Home गडचिरोली आमदार अभिजित वंजारी आज गडचिरोलीत

आमदार अभिजित वंजारी आज गडचिरोलीत

11
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या नोंदणीकरिता आज, 6 मे रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात सकाळी 9.30 वाजता देसाईगंज (वडसा) शहरातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 11.30 वाजता आरमोरी शहरातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेतील. दुपारी 1 वाजता प्रसन्न सेलिब्रेशन हॉल नवेगाव कॉम्प्लेक्स गडचिरोली येथील विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवतील. दुपारी 1.30 ते 4 वाजेपर्यंत गडचिरोली शहरातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेतील. सायंकाळी 5 वाजता बल्लारशाह (जि. चंद्रपूर) येथील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी आणि रात्री 8 वाजता चंद्रपूर येथे आगमन करणार आहेत.

error: Content is protected !!